
वैभवी चिपकर प्रथम सोहम व्दितीय तर गायत्री वरगावकर तृतीय
वेंगुर्ले । प्रतिनिधी : ६७ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे निमित्त साधुन भारतीय बौध्द महासभेच्या सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने शालेय मुलांना व्यासपीठ देण्यासाठी आयोजित केलेल्या निंबध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश मिळवत बाजी मारत या निंबध स्पर्धेत आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित करत पहिले तीन क्रमांक पटकावत त्यानी लक्षवेधी यश प्राप्त केले. या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान आणि भारतीय संविधान मानव मुक्तीचा जाहिरनामा असे दोन विषय देण्यात आले होते.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी वैभवी सुरेश चिपकर आणि व्दितीय क्रमांक विजेता सोहम सुहास टेमकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान या विषयावर भाष्य केले तर इयत्ता दहावीच्या गायत्री लक्ष्मण वरगावकर भारतीय संविधान मानव मुक्तीचा जाहिरनामा यावर निंबध लेखन करत तृतीय क्रमांक पटकावला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे लिपिक अजित केरकर आणि न्यू इंग्लिश स्कूल चे हिंदी विषयाचे अध्यापक वैभव खानोलकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. या स्पर्धेतील लक्षवेधी यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर संस्था अध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर, उपाध्यक्ष निवृत्त गट शिक्षण अधिकारी रमेश पिगुळकर, सचिव जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, संस्था सदस्य निलेश मांजरेकर आणि सर्व पदाधिकारी यांनी या उल्लेखनीय यशा बद्दल निंबध स्पर्धेचे विजेते विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अजित केरकर आणि उपक्रमशील शिक्षक वैभव खानोलकर यांचे विशेष कौतुक केले तसेच शिपाई पदावर कार्यरत असणारे आणि विविध सह शालेय उपक्रमात सतत मदत करणारे दिलीप गोठसकर यांचे हि या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले . या जिल्ह्यास्तरीय निंबध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले असुन विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या लक्षवेधी यशासाठी विविध त्याचे स्तरांतुन अभिनंदन होत आहे.











