मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत आयोजित आकाश कंदील स्पर्धेचा युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते शुभारंभ

सावंतवाडी । प्रतिनिधी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे आयोजित आकाश कंदील स्पर्धेचा युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभ हस्ते तर नरकासूर स्पर्धेचा सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत मळेवाड कुंडली कडून दिवाळीनिमित्त आकाश कंदील स्पर्धा व नरकासुर स्पर्धेचे आयोजन मुळेवाड जकात नाका येथील चौकात करण्यात आले होते. आकाश कंदील चा शुभारंभ सावंतवाडी संस्थांचे युवराज तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षजखम राजे भोसले यांच्या शुभहस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना योगेश प्रभू यांनी ग्रामपंचायतीने आयोजित केलेले ह्या दोन्ही स्पर्धां बद्दलचे कौतुक केले.

तसेच उपसरपंच हेमंत मराठे व त्यांची सर्व टीमअतिशय चांगलं काम करत असून गावाच्या विकासासाठी व निधी उपलब्ध होण्यासाठी मराठे हे नेहमीच प्रयत्नशील असतात असे सांगत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधवयांनी गावाचा विकास झपाट्याने होत असून आम्ही सर्वजण विकासासाठी कटिबद्ध आहोतयासाठी ग्रामस्थांचंही सहकार्यचांगल्या प्रकारे लाभत असल्याचे मत व्यक्त केलेतसेचसीआरपी तेजश्री पेडणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना ग्रामपंचायतीकडून शालेय मुलांच्याकलेला वाव मिळावायाकरिता आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल ग्रामपंचायतचे कौतुक केले तसेच अशा स्पर्धा होणे गरजेचे असून यामध्ये या पुढील वर्षी जास्तीत जास्तस्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन केले.

युवराज लखम राजे भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अतिशय चांगले काम करत असून त्याला आपले नेहमीच सहकार्य लाभेल,0असे आश्वासन दिले. आकाश कंदील स्पर्धा ही शालेय मुलांसाठी व खुल्या गटासाठी अशा दोन गटात घेण्यातआली असून शालेय मुलांनी आपल्याकलेच्या माध्यमातून तयार केलेले आकाश कंदील खरोखरच कौतुकास्पद आहेत असे मत व्यक्त केले.तसेच उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वच सदस्य एकजूटविणेकाम करत आहोत ग्रामपंचायत कडून आयोजित केलेल्या आकाशकंदील व नरकासुर स्पर्धेला स्पर्धकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.सरपंच मिलन पार्सेकर यांनीनरकासुर स्पर्धा व आकाश कंदील स्पर्धायास्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनाशुभेच्छा देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याउपसरपंच हेमंत मराठे यांनी प्रास्ताविक करत असताना गावाच्या विकासासाठीआम्ही सर्वजणएकत्रित काम करत असूनया तीन वर्षाच्या कालावधीत गावासाठी पाच कोटी रुपयांचा निधीउपलब्ध केला असून पुढील दोन वर्षातकोट्यावधी रुपयाचा निधी या गावाच्या विकासासाठी आणण्याचा मानद असल्याचे विशद केलेतसेच शालेय मुलांसाठी पहिल्यांदाच आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन केले असूनशालेय मुलांच्या हस्त केलेला वाव मिळावा हा एकच हेतू असल्याचे मराठी यांनी सांगितलेया स्पर्धेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचे मराठी यांनी कौतुक करत उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.मुळेवाड जकात नाका येथील रिक्षा चालक-मालक संघटनेला स्थापन करून २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद नाईक यांचा लखन राजे भोसले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सुपारीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला व संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक अमोल नाईक कविता शेकडे सानिका शेवडेपोलीस पाटील दिगंबर मसुरकर तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पार्सेकरवसंत राणे गुरुजी राधाकृष्ण दूध सोसायटीचे संचालक सतीश सातार्डेकर अंगणवाडी सेविका पूर्वा नाईकमानसी सातार्डेकर संगीता नाईकप्रियंका पारसेकर सीआरपी तेजश्री पेडणेकर श्वेता रेडकर आशा कर्मचारी सेजल कुंभारअर्पिता मुळीक अनुष्का नाईक मदतीस अनुष्का नाईक मुख्याध्यापिका सौ. वेंगुर्लेकर शिक्षक कळसुलकर आदी उपस्थित होते.