वेंगुर्ले येथे “सचिन वालावलकर मित्र मंडळा”ची स्थापना

अध्यक्षपदी संतोष परब यांची निवड

वेंगुर्ले | प्रतिनिधी : मित्रमंडळच्या माध्यमातून मी आपल्या पाठीशी राहीन आणि तुमच्या मार्फत नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. वेंगुर्ले च्या विकासासाठी जास्तीत जास्त शासकीय निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील. वेंगुर्ले शहरातील सर्व युवकांना या मंडळाच्या माध्यमातून एकत्र आणायचे काम शिवसेना युवक शहर प्रमुख संतोष परब यांनी केले त्यामुळे मंडळामार्फत चांगले उपक्रम राबवूया असे आवाहन सचिन वालावलकर यांनी केले.
वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत आज “सचिन वालावलकर मित्र मंडळाची” स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष परब यांची निवड करण्यात आली असून लवकरच उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना सचिन वालावलकर बोलत होते.

वेंगुलेत विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने या मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे संतोष परब यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. तसेच सर्व युवकांनी आपले मनोगत केले. यावेळी ऍड. मनीष सातार्डेकर, जयेश गावडे, बाळा आरवंदेकर, सागर शिरसाट, प्रशांत सावंत, बाबू टेमकर, हेमंत नाईक, भूषण माडकर, लवू गावडे, शैलेश केसरकर, जयंत सावंत, सुचित सावंत, संदेश रेडकर, मनीष कोळेकर, सुचित परब, सोहम आडेलकर आदी उपस्थित होते. बैठकीत आभार ऍड. मनिष सातरडेकर यांनी मानले.