कणकवली : शहरात शिवीगाळ केल्याचा राग येऊन एका युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शहरात घडली. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता पोलीस ठाण्यातही गेलं. मात्र या मारहाणीची चर्चा कणकवलीत सुरू होती. या घटनेने पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी देखील झाली होती. यावेळी आवारात नाहक गर्दी नको म्हणून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खाकी भाषेत समज देत गर्दी कमी केली. कणकवलीत कांबळी गल्ली येथे भालचंद्र महाराज मठानजीक युवकांची शाब्दीक बाचाबाची झलयाची माहिती समोर आली. शिवीगाळ करणाऱ्या त्या युवकाला तेथील व्यवसायिक असलेल्या युवकांनी समजावून पाहिले. तरीही अर्वाच्च शिवीगाळ केल्याचे म्हणत समजावणाऱ्या दोन युवकांनी त्या शिवीगाळ करणाऱ्याला मारले, अशी घटना आहे.
सदरची घटना आपापसात मिटवण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र आपापसात मिटवण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांच्यात पुन्हा एकदा खटका उडाला. त्याच विषयावर पुन्हा पोलीस ठाण्याच्या आवारातच थेट सीसीटीव्ही समोरच शाब्दिक बाचाबाची झाली. पोलीस अधिकऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी समज देत ते प्रकरण कायदेशीर मार्गाने मिटवण्याचा सल्ला दिला. याबाबत कणकवली पालिसांत परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली.












