राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका भाजपाच्या वतीने भाजपाच्या राजापूर तालुका संपर्क कार्यालयात भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाजपेयी यांना आदरांजली वाहीली.
यावेळी भाजपा ओबीसी सेलेचे प्रदेश सचिव अनिलकुमार करंगुटकर यांनी दीपप्रज्वलन केले तर जिल्हा सचिव रविंद्र नागरेकर यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्री. करंगुटकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश गुरव ज्येष्ठ कार्यकर्ते, महादेव गोठणकर, तालुका सरचिटणीस अमोल सिनकर यांनीही अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी सौ. शितल पटेल, सौ. सुयोगा जठार, श्रीमती. शितल रहाटे, शहर अध्यक्ष संदेश आंबेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अरविंद लांजेकर, रविंद्र मयेकर, स्वप्नील गोठणकर, विजय सप्रे, रविंद्र कदम, प्रशांत गुरव आदी उपस्थित होते.












