नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड मध्ये उद्यापासून “जल्लोष” आ. नितेश राणे करणार उद्घाटन

नववर्षाच्या स्वागतासाठी व ज्यामुळे देवगडची ओळख आहे असा जल्लोष कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक 30 पासून सुरू होत असून कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत

शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी शालेय चित्रकला स्पर्धा होईल…खवय्यासाठी फूड्स्टॉल, लहान मुलासाठी अनेक खेळ असतील..सायंकाळी 7.00 वा.मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य स्टेजचे अनावरण होईल.. व गणेश वंदना होईल.. व 8.00 वाजता मा. आमदार नितेश राणे यांचे हस्ते जल्लोष कार्यक्रमाचे उदघाटन होईल.यानंतर उदघाटन पर स्थानिक कलाविष्कार सादर करण्यात येतील.व रात्रौ 9.00 वाजता ऑर्केस्ट्रा बेधुंद सादर करण्यात येईल.

यामध्ये गायिका कविता राम, नचिकेत देसाई आदी कलाकार असतील.

रविवार दि.31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता काही निवडक रेकॉर्ड डान्स सादर केले जातील.

रात्रौ 9.00 वाजता जल्लोष 2024 हा हास्य सम्राट फेम अमीर हडकर यांचाऑर्केस्ट्रा सादर केला जाईल. यामध्ये दगडी चाळ फेम पार्श्वगायिका

मुग्धा कराडे( पार्श्वगायिका झिम्मा,छबीदार छबी,राघू पिंजऱ्यात आला, अलाहीदा, पारवा, लग्नाळू) , स्वप्निल गोडबोले,सौरभ दप्तरदार अंशिका चोणकर (झी टीव्ही सारेगामापा 2021,रनर अप सुर नवा ध्यास नवा ), डांसर मेघा, निवेदक दुनियादारी फेम प्रणव रावराणे आदी कलाकार समाविष्ट असतील.

आणि रात्रौ बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी होईल…

अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन यावर्षी करण्यात आलेल आहे.. आपण सर्वांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.असे आवाहन जल्लोष परिवारातर्फे करण्यात येत आहे.