अपरांत साहित्य कला प्रबोधिनी कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी सिद्धार्थ तांबे तर कार्याध्यक्षपदी सुचिता गायकवाड

कणकवली : अपरांत साहित्य कला प्रबोधिनीची कणकवली तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून अध्यक्षपदी प्रा. सिद्धार्थ गोपाळ तांबे, कार्याध्यक्ष सुचिता दामोदर गायकवाड
सचिव- सूर्यकांत परशुराम चव्हाण(फोंडाघाट),
उपाध्यक्ष- कल्पना मलये व
सुरेश राघो कांबळे यांची तर
सहसचिव- रूपाली तुकाराम कदम, हिशोब तपासणीस- दीपक वामन कांबळे (सांगवे), संघटक- किशोर देवू कदम निवड झाली.

तर कार्यकारणी सदस्य म्हणून निलेश सदानंद पवार(अभिनेता) सुदीन सुरेश तांबे,दीपक तळवडेकर,
मिलिंद सर्पे, स्नेहल सुनील तांबे, आनंद बालाजी तांबे,संजय गोपाळ जाधव,अर्पिता मुंबरकर, सल्लागार – श्री पी जे.कांबळे व डॉ.बी.एल.राठोड यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारणी नियुक्तीच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव राजेश कदम व जिल्हा कार्यकारणी सदस्य जनीकुमार कांबळे, बौद्ध धम्माचे अभ्यासक गोपी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.