आंबेगाव येथील श्री देव क्षेत्रपाल देवस्थान वार्षिक जत्रोत्सव उद्या

सावंतवाडी | प्रतिनिधी : आंबेगाव येथिल जागृत देवस्थान श्री देव क्षेत्रपाल देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या 8 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळ पासून देवाची पुजा त्यानंतर नारळ ठेवणे नवस फेडणे तसेच रात्री 12 वाजता मंदिरात भोवती तरंग काठी सह पालखी मिरवणूक नंतर खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गावपंच व आंबेगाव ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परब यानी केले आहे.