मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात माजी नगरसेवक विजेते

सावंतवाडीत आयोजन: पत्रकारांचा संघ उपविजेता

सावंतवाडी : सावंतवाडीत माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात माजी नगरसेवक संघाने पत्रकारांच्या संघावर सात गडी राखून मात करत नगरसेवक पत्रकार मित्र चषकावर आपले नाव कोरले आहे.   तर उपविजेता संघ पत्रकारांचा ठरला. सावंतवाडीत माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यातील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर पार पडला.यावेळी दिग्गज खेळाडूंनी आकर्षक फटकेबाजी करत उपस्थितांची व्हाव्हा मिळवली एकूण चार सामने पार पडले.

तर अंतिम सामना पत्रकार व माजी नगरसेवक कर्मचारी यांच्यात झाला. या सामन्यात पत्रकारांच्या संघाने आकर्षक असे 6 षटकांत 60 धावा केल्या यात सचिन मांजरेकर यांची खेळी अप्रतिम राहिली तसेच त्यांना इतर खेळाडूंनी ही त्याना चांगली साथ दिल्याने संघाची धावसंख्या 60 एवढी झाली होती.हे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या माजी नगरसेवक व कर्मचारी यांच्या संघाने पहिल्या चेंडू पासून आक्रमक खेळ केला एकट्या निखिल कांबळे यानेच अवघ्या दोन षटकात तीस धावा केल्या आणि तो बाद झाला त्यानंतर आलेल्या अक्षय व दिपक म्हापसेकर महेंद्र सावंत यांनी जोरदार खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला हा सामना शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतना नगरसेवक व कर्मचारी संघाने विजेतेपद मिळवत माजी नगरसेवक पत्रकार चषकावर आपले नाव कोरले.तसेच उपविजेतेपद हे पत्रकारांच्या संघाने फटकावले.

यावेळी या मैत्रीपूर्ण सामन्यात विशेष योगदान देणाऱ्या माजी नगरसेवक उमाकांत वारंग विलास जाधव सुरेश भोगटे उमेश कोरगावकर याचा सत्कार करण्यात आला तर पत्रकारांनी ही आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार वसंत केसरकर अभिमन्यू लोंढे सिताराम गावडे अनंत जाधव हरिश्चंद्र पवार प्रविण मांजरेकर संतोष सावंत अमोल टेंबकर विजय देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान सामन्यात मॅन ऑफ द मॅच सचिन मांजरेकर तर मॅन ऑफ द सिरिज निखील कांबळे तर उत्कृष्ट आयोजन म्हणून उमाकांत वारंग यांना गौरविण्यात आले तर विजेत्या व उपविजेत्या संघाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ज्येष्ठ पत्रकार वसंत केसरकर अभिमन्यू लोंढे यांनी चषक देत गौरविले.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, उमाकांत वारंग, अफरोझ राजगुरू, क्षिप्रा सावंत, सुरेश भोगटे, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, संतोष सावंत,सिताराम गावडे सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव, डिजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, प्रवीण मांजरेकर, राजू तावडे, वैशाली खानोलकर, नंदू मोरजकर, विनायक गांवस, नागेश पाटील, भुवन नाईक, निखिल माळकर, नितेश देसाई, रामचंद्र कुडाळकर, आनंद धोंड, शैलेश मयेकर, रुपेश पाटील, विजय देसाई, राजेश नाईक, प्रवीण परब, जतीन भिसे, रुपेश हिराप, राजाराम धुरी, संतोष मुळीक, मयूर चराटकर, प्रशांत मोरजकर, संजय पिळणकर, लक्ष्मण आवाड, पालिका कर्मचारी भाऊ भिसे, दीपक म्हापसेकर उपस्थित होते.

साळगावकर याच्या कडून महिला नगरसेविकेचा सन्मान

या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात आवर्जून उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका अफरोज राजगुरू किर्ती बोंद्रे साक्षी कुडतरकर क्षिप्रा सावंत शुभांगी सुकी याचा विशेष सन्मान करण्यात आला.या सत्कार कार्यक्रमाने या नगरसेविका ही भारावून गेल्या.