राम मंदिराच्या आंदोलनामध्ये संजय राऊत खरंच असतील तर स्वतःचा,उद्धव ठाकरे यांचा एक तरी पुरावा द्यावा

सामना मधील पगारी नोकर या पलिकडे आपले योगदान काय? : आ. नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर डागले टिकास्त्र

कणकवली : ज्याला ज्याचे घरचेच लोक फुल डाउटमध्ये २४ तास बघतात असा, डाऊटफुल असलेला संजय राजाराम राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे किंवा त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करणे हे हास्यास्पद आहे. असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी तुमच्या मालकाची झोप उडवण्यासाठी ते शंभर टक्के सक्षम आहेत. म्हणून ज्यांना सगळेच डाऊटफुली बघतात अशा, संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना फुल डाऊट, हाफ डाऊट बोलने हा २०२४ चा फार मोठा विनोद आहे, अशा शब्दात आ. नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र डागले. कणकवलीत प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, राम मंदिराच्या आंदोलनामध्ये मुरली मनोहर जोशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विश्व हिंदू परिषद, संघ परिवाराचे कार्यकर्ते असतील यांचे सगळ्यांचे पुराव्या सकट फोटोग्राफ आहेत. त्यामध्ये आंदोलनात कोण – कोण होते हे त्यांना सिद्ध करावे लागत नाही. प्रश्न विचारावे लागत नाहीत, असे प्रत्युत्तर अ. नितेश राणेंनी संजय राऊत यांना दिले. अयोध्या मधील राम मंदिराच्या निमित्ताने आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग प्रत्येक पिढीला माहित आहे. पण संजय राऊत आणि उद्धव ठाकरेचा नेमका काय सहभाग होता, याचा एक तरी पुरावा संजय राऊत यांनी दाखवून द्यावा. तुम्ही सांगाल ते मी करेन, असे चॅलेंजही आ.राणे यांनी संजय राऊत यांना दिले आहे. उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचे आंदोलन याबद्दल तुम्ही काही बोलू नका. कारण तुम्ही तेव्हा सामना मधील पगारी नोकर होता. आज पण आहात. त्यामुळे त्या पलीकडे तुमचे राम मंदिरासाठी काहीही योगदान नाही, असा हल्लाबोल देखील श्री. राणे यांनी ठाकरे व राऊतांवर केला.

मातोश्री ला उडवण्याचा धमकीचा फोन ही अविश्वासू घटना – आ. नितेश राणे
धमकी दिली असे सांगून स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न असणार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची जुनी सवय आहे, म्हणून धमकीचा फोन उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर आला याच्यावर मला विश्वास नाही असे मत आ. नितेश राणे यांनी व्यक्त केले. मातोश्री ला उडविण्याचा धमकीचा फोन आला अशी घटना सध्या सगळीकडे पसरत आहे. मात्र त्या मातोश्री मध्ये राहत आहेत हे उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय! ज्या उद्धव ठाकरेंना मानेवर बसलेल्या मच्छर मारता येत नाही, त्यांना उडविण्यासाठी कोणाकडे वेळ आहे. जो आता जिहाद्यांचा एकदम लाडका झालेला आहे. ज्याला मुल्ला उद्धव असे नाव पडले आहे. त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्यासाठी आता कोणाला वेळ आहे.त्यामुळे या बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका. तो फोन कदाचित पाटणकरांच्या घरातून करून घेतला असेल असा उपरोधी टोलाही आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंवर लगावला.

ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही पहिला शिवसैनिकांची होती. असे आम्ही ऐकले आहे. आता यांच्याकडे बाळासाहेबांच्या काळासारखा एकही निष्ठावंत शिवसैनिक राहिलेला नाही. जो उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांची सुरक्षा करेल. मुळात तो फोन खरच आला होता की यांच्याच मित्र परिवाराने केला होता. याची पहिली चौकशी लागली पाहिजे. त्याची आम्ही एसआयटी किंवा सीआयडी चौकशीची मागणी करणार असे श्री. राणे यांनी सांगितले. काँग्रेस आणि तरुण चेहऱ्यांचा काही संबंध नाही. काँग्रेस पक्ष ही गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्याच्यासाठी राहुल गांधीला मोठा करण हा त्यांचा एक कलमी अजेंडा आहे. त्यामुळे कोणत्याही तरुण नेत्याला आता काँग्रेस पक्षामध्ये व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म राहिलेला नाही. दोन अनिल नी आणि संजय राजाराम राऊत ने उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम पहिल्यापासून केलेला आहे. आता शेंबड्यासारखा रडत बसून फायदा नाही. पत्रकार परिषद घेऊन काही उपयोग नाही.

सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि नेते एकत्र काम करणार!
जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा कुठे ना कुठे काही ना काहीतरी धूस पुस असते पण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचा एक मॅग्नेट आम्हाला सर्वाना जोडलेला आहे पण देशासाठी नरेंद्र मोदीच पाहिजे या एकाच मतासाठी सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि नेते तुम्हाला एकत्र काम करताना दिसतील.