मुख्याध्यापक पी.जे. कांबळे यांना मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्ट शिक्षण गौरव पुरस्कार

कणकवली : मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणारा स्व.मारूती तुकाराम मुरकर यांचे स्मरणार्थ शिक्षण गौरव पुरस्कार कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळा मुख्याध्यापक श्री.पी.जे. कांबळे यांना जाहीर झाला आहे. ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा.दिवाकर मुरकर यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.

मुख्याध्यापक कांबळे यांचे विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळेच्या शैक्षणिक प्रगती मध्ये भरीव कामगिरी केली आहे.एक शिक्षक म्हणून त्यांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सुसंवाद ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी खूप मोठ योगदान आहे.

यांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे असे ट्रस्ट चे अध्यक्ष मुरकर सर यांनी सांगितले.सदरचा पुरस्कार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रांताधिकारी जगदीश कातकर याचे हस्ते देण्यात येणार आहे.श्री.कांबळे यांचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.