अ वि. बावडेकर विद्यालय, बा म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ संपन्न
वेंगुर्ले l प्रतिनिधी :विद्यार्थ्यांनी इतिहासात डोकावले पाहिजे. पूर्वी जनरल नॉलेज वर हुशारी अवलंबून होती आता गुगलवर एका सेकंदात सर्व उपलब्ध होते. त्यामुळे लक्षात ठेवण्याची गरज नाही. आता शिक्षणासाठी आर्थिक विवंचनेची गरज नाही समाजातील दाते या अडचणी दुर करण्यासाठी आहेत तुमची इच्छा आणि तयारी पाहिजे मूळ इतिहास जाणून घेतला पाहिजे, असे सांगत साहित्यिक तथा कवी विजय चोरमारे यांनी
शिरोडा येथे साहित्यिकांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आल्या बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थी आई-वडीलासोबत पारितोषिक स्वीकारताना पाहून सर्व साहित्यिक खूष झाले. त्याना याशाळेची संकल्पना आवडली. विद्यार्थ्यांसोबत आई-वडिलांचा सन्मान करण्याची संकल्पना सर्व ठिकाणी सुरू झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान संचलित,गुरु. अ वि. बावडेकर विद्यालय, बा म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालय व तांत्रिक संकुल शिरोडा या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ओटवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी वक्ते पत्रकार साहित्यिक कवी विजय चोरमारे बोलत होते. त्यांच्या सोबत व्यासपीठावर कथाकार साहित्यिक कवी रफीक सुरज, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह तथा कवी डाॅ. विनोद कांबळे, संस्था उपाध्यक्ष शंकर कांबळी, उद्योजक जनार्दन शेटये, दिनकर नागवेकर, प्रमोद कावळे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नाईक, सहसचिव तथा पर्यवेक्षक मंगेश कांबळी, जेष्ठ संचालक दिनकर नागवेकर, खजिनदार प्रमोद कावळे, संचालक प्रदिपकुमार प्रभू, रेडीचे ग्रामस्थ राजेन्द्र कांबळी, शिरोडा ग्रामपंचायत माजी सरपंच विजय पडवळ, आरवली ग्रामपंचायत माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य बबन बागकर, श्री सरस्वती विद्यालय आरवली- टांक हायस्कूल चे मुख्याध्यापक मोहन जाधव, शिक्षक पालक उपाध्यक्ष अणसूरकर, माता पालक सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
अन्य मान्यवरांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष स्थानावरून ओटवणेकर सरांनी वि.स.खांडेकर आणि जयवंत दळवी यांच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य उमेश सुकी यांनी केले. सूत्रसंचालन राजेश राठये यांनी, प्रशालेच्या प्रगतीची माहिती विद्यालयाच्या शिक्षिका निशा वालावलकर यांनी, बक्षीस वाचन प्राध्यापक के.डी. पोवार व पल्लवी नाईक यांनी तर आभार दिलीप पणशीकर यांनी मानले.यावेळी विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम सादर झाले.












