सावंतवाडी । प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मंजूर मळगाव नेमळे मुख्य रस्ता ते रवळनाथ मंदिर पर्यंत जाणारा रस्ता आणि कॉजवेच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, माजी सभापती राजू परब, सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच गणेश पेडणेकर, निलेश कुडव, दादा परब, गुरुनाथ गांवकर, निळकंठ बुगडे, दीपक जोशी, प्रकाश जाधव, पांडुरंग राऊळ, प्रेमनाथ राऊळ, नवनाथ राऊळ, तात्या लातये, प्रसाद नाईक यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.












