सार्थक वनकुद्रे, आत्माराम रेवंडकर प्रथम क्रमांकाचे विजेते

शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने आयोजित वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमित खोत | मालवण : उद्योजक सतीश आचरेकर यांच्या पुढाकारातून शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्ताने मालवण शहरातून काढण्यात आलेल्या शोभयात्रेतील वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान गटात सार्थक वनकुद्रे तर मोठ्या गटात आत्माराम रेवंडकर प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले.

वेशभूषा स्पर्धेत लहान गटात
56 स्पर्धक सहभागी झाले. यात सार्थक वनकुद्रे (प्रथम), खुशी सावंत (द्वितीय), गार्गी कोरगावकर (तृतीय), उत्तेजनार्थ स्वयम नेवाळकर, रुचिरा कुंभार, आनंदी सातार्डेकर, स्वराज वनकुद्रे, अनय लाड, समर्थ बांदकर,तस्मय पाटकर, वेदांत चव्हाण विजेते ठरले. मोठा गट वेशभूषा स्पर्धेत 20 स्पर्धक सहभागी झाले. यात आत्माराम रेवंडकर (प्रथम), कृष्णा मेस्त्री (द्वितीय), चिन्मयी पारकर (तृतीय) उत्तेजनार्थ तनिष्क चव्हाण, नवेली मेस्त्री, जयेंद्र केळुसकर, समृद्धी तांडेल, अमोल भिसे, प्रतिज्ञा माळकर, vनेत्रा आचरेकर, वेदिका कुमठेकर विजेते ठरले. आयोजक व मान्यवर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक सुजाता शेलटकर, विकी जाधव यांनी केले.

शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवणचे
सतीश आचरेकर, बाबा जोशी, रोहन आचरेकर, जितेश ढवळे, रोहित जोशी, आनंद आचरेकर, चिनू लोणे, अनिकेत जोशी, मनोज आढाव, अंकित जोशी, अनमोल आढाव, प्रताप आढाव, गौरेश आढाव, सुशांत कोचरेकर, सूरज लोणे, सिद्धेश मालिये, संजय नार्वेकर, सहदेव बापार्डेकर, पराग परब, फ्रान्सिस नऱ्होना, लॉरेन्स नऱ्होना, विल्सन फर्नांडिस, जॉनी फर्नांडिस, राजू आढाव, बबन कुबल, वैभव कुरंदरे, सूरज लोणे, माँटी तारी, दयानंद जंगले, तुषार मसुरकर, कुलराज बांदेकर यांसह अन्य सहकारी सदस्य, महिला भगिनी सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले.

भव्य शोभयात्रा नंतर रात्रौ बंदर जेटी येथे सुप्रसिद्ध शिवबा हे नाटक सादर करण्यात आले. त्यालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपुर्ण कार्यक्रमाच्या भव्यदिव्य स्वरूपातील आयोजनाचे सर्वांनी कौतुक केले.