सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची २ रोजी मासिक सभा

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा शनिवार दिनांक २ मार्च रोजी, सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व सभासद बंधू भगिनींनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.