शिवसेना विकासाला प्राधान्य देणारा पक्ष : सचिन वालावलकर

आडेली ओहोळावर पूल बांधणे कामासाठी ६० लाख रुपये निधी मंजूर

वेंगुर्ले: दाजी नाईक : शिवसेना नेहमीच विकासाला प्राधान्य देणारा पक्ष असून शिवसेनेच्या माध्यमातून सद्या प्रत्येक गावात विविध विकास कामे मार्गी लावली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आडेली गावात अनेक दिवसांची मागणी असलेल्या पुलाचे काम शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या मुळे मंजूर झाले आहे. आडेली आंबेडकरनगर ते घोगळ कालीया मसणवट रस्त्यालगत ओहोळावर पूल बांधणे या कामासाठी ६० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भुमिपूजन करण्याची संधी मला मिळत आहे, ते मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी केले.

आडेली येथील या कार्यक्रमाला सरपंच यशस्वी विष्णु कोंडसकर, उपसरपंच परेश हळणकर, शिवसेना वेंगुर्ला तालूका प्रमुख नितीन मांजरेकर, भाजपा तालुका सरचिटणीस समीर कुडाळकर तसेच सानवी कोंडसकर-सदस्य, सुधीर धुरी-सदस्य, प्रतिमा धर्णे- सदस्य, आत्माराम (दादा) धर्णे (सो. व्हा.चेअरमन), विष्णु ( तात्या) कोंडसकर- ( मा.ग्रा.सदस्य), पांडूरंग आडेलकर-(मा. पोलिस पाटील), अविनाश तोरसकर, वसंत धर्णे, राजाराम (तात्या) धर्णे, महादेव देवू धर्णे, महादेव हरी धर्णे, सहदेव धर्णे, भिवा धर्णे, संजय वसंत धर्णे,अरुण धर्णे,अरुण धर्णे, संजय कृष्णा धर्णे, मारूती वाघे, मंगेश आडेलकर, बाबुराव आडेलकर, सुभाष धर्णे, वासुदेव धर्णे, दत्ताराम धर्णे,निखिल धर्णे,गुरुनाथ धर्णे,सूर्यकांत धर्णे,सिद्धेश हळणकर, सिताराम धर्णे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल गावातर्फे मंत्री श्री.दिपक केसरकर यांचे सरपंच यशस्वी विष्णु कोंडसकर यांनी आभार मानले.