न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची महिमा अभिनय स्पर्धेत प्रथम

 

वेंगुर्ले l प्रतिनिधी :महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या जिल्ह्यास्तरीय ऑनलाईन अभिनय स्पर्धत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला विद्यालयाची इयत्ता नववीची महिमा रूपेश नार्वेकर हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. बदलती जीवनशैली

स्वीकारत महिलांनी सर्व क्षेत्रांमध्ये आपले योगदान दिलेले आहे. अखिल स्त्री जातीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ०८ मार्चला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाविन्यपूर्ण उपक्रम घेणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर- मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘महिलांसाठी’ ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात केले होते

या स्पर्धेत जिल्ह्यांत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या कु.महिमा रूपेश नार्वेकर हिला मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे या स्पर्धे साठी तिला अजित केरकर आणि उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर आणि तिच्या पालकांनी विशेष मार्गदर्शन केले

या जिल्ह्यास्तरीय स्पर्धेतील यशाबद्दल

यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलचे मुख्याध्यापक

उमेश वाळवेकर , संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव तथा जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष रमेश पिगुळकर,निलेश मांजरेकर आणि सर्व पदाधिकारी यांनी या यशस्वी विद्यार्थीनी महिमा नार्वेकर तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक खानोलकर सर आणि लिपिक श्री अजित केरकर, यांच्या सह

यशस्वी विद्यार्थ्यांनीचे पालकांचे हि विशेष अभिनंदन केले

अभिनय स्पर्धत घवघवीत यश संपादन करून जिल्हा स्तरावर यश पटकावणाऱ्या या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा प्रशालेचे आणि या विद्यार्थ्यांनी चे हि सर्वत्र कौतुक होत आहे