वैभववाडी येथील पादचारी मृत्यू प्रकरण : ट्रक चालक अद्यापही फरार

वैभववाडी | प्रतिनिधी :
एडगांव येथील प्रसिद्ध भजनी बुवा रामचंद्र आकाराम रावराणे उर्फ बाबुराव यांचा अपघात होऊन मृत्युस कारणीभूत ठरल्याचा आरोप असणाऱ्या ट्र्क चालकाला पोलिसांकडून अद्याप अटक झालेली नाही. तो अजून फरार आहे.
बाबुराव रावराणे हे मंगळवारी सायंकाळी वैभववाडी बाजार पेठेतून आपल्या एडगाव येथील घरी जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धक्का दिल्याने ते जबर जखमी होऊन मृत्यू झाले होते. मात्र ट्रक चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ट्र्क चालकांला त्वरित अटक करा अशी मागणी ग्रामस्थांमधून वारंवार केली जात आहे. परंतु ट्रक चालक अद्यापही आहे. फरार चाककाचा शोध सुरू असल्याची माहिती वैभववाडी पोलिसांनी दिली आहे.

संबंधित ट्रक चालला अटक होऊन त्यावर कारवाई व्हावी या साठी आज सायंकाळी बाबुराव रावराणे यांच्या कुटुंबीयांनी व काही भजन प्रेमींनी वैभववाडी पोलिसांची भेट घेतली.