खेड(प्रतिनिधी) एकीकडे कोकण रेल्वेगाड्या विक्रमी गर्दीने धावत असल्याने जागा मिळवताना प्रवाशांना घाम फुटत असतानाच दुसरीकडे विलंबाच्या प्रवासाची भरही कायमच आहे. विकेंड ला ९ रेल्वेगाड्या लेट धावल्या
कोच्युवेली-एलटीटी तब्बल ६ तास तर जबलपूर कोईमतूर स्पेशल तब्बल साडेचार तास उशिराने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. अन्य ७ रेल्वेगाड्यांच्या सेवेवरही परिणाम झाला.
कोकण मार्गावर विकेंडला उशिराने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना मनस्तापच सहन करावा लागत आहे. रविवारी रेल्वेगाड्या विलंबाने मार्गस्थ झाल्याचा प्रवाशांना फटका बसला. जबलपूर- कोईमतूर स्पेशल साडेचार तास तर एलटीटी-थिविम उन्हाळी स्पेशल चार तास २० मिनिटे विलंबाने धावली.
नागपूर मडगाव स्पेशल २ तास १५ मिनिटे उशिराने रवाना झाली. एलटीटी-मडगाव एक्सप्रेस
२ तास तर गोवा संपर्कक्रांती एक्सप्रेस १ तास विलंबाने मार्गस्थ झाली. ओखा एक्सप्रेस २ तास तर एलटीटी-कोच्युवेली साप्ताहिक एक्स्प्रेस २ तास ५० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेसही १ तास ५० मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम राहिला. दुरांतो एक्सप्रेस १ तास विलंबाने रवाना झाली.












