‘उबाठा’ युवासेनेच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखाला तडीपारीची नोटीस !

खेड (प्रतिनिधी)
उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. ते खेड तालुक्यातील कोरेगाव येथील आहेत. त्यांना देण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटीसची सुनावणी खेडचे प्रांताधिकारी  यांच्यासमोर होणार असून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात येणार असल्याचे समजते.
अजिंक्य मोरे यांच्यावर विविध प्रकारचे ७ गुन्हे दाखल झालेले असून त्यामध्ये एसीबी अधिकारी यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण आणि घोषणा, तसेच शिवसेना नेते रामदास कदम यांच्या विरोधात उबाठा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी घोषणाबाजी आदी विषया मूळे त्यांच्यावर प्रशासनाचे लक्ष आहे