ओटवणे(प्रतिनीधी) : नारायण राणे साहेबाना मोठ्या मताधिक्याने विजयी करत खासदार करायचंच यासाठी सर्वच कार्यकर्ते कामाला लागले असून आज माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील ओटवणे गावातून नारायण राणे साहेबांच्या प्रचाराला रवळनाथ चरणी नारळ ठेवून शुभारंभ करण्यात आला . शिवसेना(शिंदे गट) आणि भाजप चे कार्यकर्ते एकदिलाने प्रचाराला लागले असून राणे साहेबाना विजयी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, अजय सावंत, सचिन बिर्जे, ओटवणे ग्रा. सदस्य प्रशांत बुराण, लुमा जाधव, विश्वनाथ कोटकर, एकनाथ कोटकर, माजी सरपंच उत्कर्षा गावकर, उमेश गावकर, संजय कविटकर,ग्रा. सदस्य मनाली गावकर, ग्रा.सदस्य समीक्षा गावकर, कांचन भगत, मंगेश गावकर, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.











