मंडणगड नरपंचायतीच्या स्वच्छतेसंदर्भात सावळा गोंधळ
मंडणगड | प्रतिनिधी
मंडणगड नगरपंचायत एकीकडे शहर स्वच्छ करत असताना दुसरीकडे मात्र लगतच्या गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणन्याचा प्रयत्न करीत आहे. मंडणगड शहर परीसरात मृत झालेली जनावरे कचरा डेपोमध्ये उघडयावर टाकण्यात येत असल्याचा व्हिडीओ सध्या शहर परीसरात व्हायरल होत असल्याने मंडणगड शहर व भिंगळोली गावातुन या संदर्भात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नगरपंचायत सध्या संपूर्ण शहरातील कचरा भिंगळोली गावाच्या हद्दित चिरेखाणीत टाकत असून हा कचरा उघडयावर टाकण्यात येत आहे. या परीसराला नगरपंचायतिकडून कोणतेही कुंपण घालण्यात आलेले नाही. या परीसरात पाच गुरे मृत अवस्थेत पडलेली आहेत.ह्या मेलेल्या गुरांना खाण्यासाठी या परीसरात भटके श्वान मोठया प्रमाणात असून ते माणसांच्या अंगावर येत असल्याने या ठिकाणी कोणीही पाहण्यासाठी जात नाही. दरम्याने मंडणगड शहरात मृत झालेले वासरू नगरपंचायतीचे कर्मचारी कचरा गाडीत भरून नेताना व तो कचरा कचरा डेपोमध्ये उघडयावर टाकतानाचा व्हिडीओ परीसरात पसरत आहे. यामुळे नागरीकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नगरपंचायतीच्या या भोंगळ कारभाराबाबत कारवाई होणार का? असा प्रश्न आता नागरीकांमधून विचारला जात आहे. कचरा डेपो परीसराची पाहणी नागरीकांनी केली असता या ठिकाणी चार गुरे मरूण पडलेली व त्यापैकी अधीक जनावरांना वन्य प्राणी व श्वान यांनी अर्धे खाल्याचे दिसून आले.कचऱ्यासोबत मृत जनावरे या डेपोत उघडयावर पडली असल्याचे पहावयास मिळत आहे. हि मृत जनावरे दफन करणे अथवा त्यांच्या शवाची विल्हेवाट नगरपंचायती कडून करण्यात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. डेपो मध्ये कचरा उघडयावर टाकल्याने या परीसरात अन्य गुरे तसेच श्वान व वन्य प्राण्यांचा वावर अधिक वाढला आहे.
नगरपंचायतीने कचरा डेपो करीता प्रशासकीय कालावधीत कोठ्यावधी रूपयांना जागा खरेदी केली होती.
मात्र याठीकाणी अद्याप कचरा डेपो सुरू करण्यात आलेला नाही. सुरूवातीला काही काळ कचरा या जागेत टाकण्यात आला त्यावेळसही डेपोला कुंपण नसल्यामुळे परीसरातील गुरे कचरा खाण्यासाठी जात होती व या ठिकाणी गुरे दगावण्याचा प्रकार वाढला होतात्यामुळे नागरीकांच्या तक्रारी वाढू लागल्याने पावसाळ्यामध्ये हा कचरा डेपो बंद करून भिंगळोली गावच्या हद्दित भाडे तत्वावर जागा घेवून तेेथे कचरा टाकण्यात येत आहे. भिंगळोली , पाट परीसरातील पशुधनाला धोका निर्माण झाला आहे. तसेच नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.










