सावंतवाडी शहरात डोअर टू डोअर प्रचारावर भर माजी सभापती सुधीर आडीवरेकर यांचा पुढाकार

सावंतवाडी : शहारत प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारात मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शहरासह मतदारसंघातून मोठं लीड देणार असल्याचा दावा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

सावंतवाडी शहरात ना. नारायण राणे यांना मोठं मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी व्यक्त केला. या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते, शिवसैनिक, मनसैनिक, राष्ट्रवादी व रिपाई आदी मित्रपक्ष मिळून एकत्र प्रचारात सहभागी झाले आहेत.

डोअर टू डोअर जात महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नारायण राणेंना विजयी करण्यासाठी मतदानाच आवाहन केले.याप्रसंगी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, बाबु कुडतरकर, देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे, संतोष गांवस, बंटी पुरोहित, मोहीनी मडगावकर, किशोर चिटणीस, परिक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, केतन आजगावकर, सत्यवान बांदेकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.