नांदरुख सरपंच भाऊ चव्हाण यांसह सदस्य व ग्रामस्थांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
अमित खोत | मालवण : नांदरुख गावच्या विकासकामांना प्राधान्य देत, गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे भाजप नेते निलेश राणे यांनी नांदरुख येथे बोलताना स्पष्ट केले.
नांदरुख सरपंच भाऊ चव्हाण यांसह सदस्य दशरथ पोखरणकर, नम्रता महादेव चव्हाण, राजश्री सत्यविजय कांबळी, समीक्षा चव्हाण तसेच अनेक ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीत नांदरुख कुरले भाटले वाडी येथे आयोजित कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्या सर्वांचे निलेश राणे यांनी भाजप पक्षात स्वागत केले.
केंद्रीय मंत्री राणे साहेबांचे विशेष प्रेम या गावावर आहे. राणे साहेब , पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावात जास्तीत जास्त विकासनिधी देण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला. नांदरुख गावातही विकासनिधी देण्याचा प्रयत्न कायम राहील. या गावातील पाणी प्रश्न, रस्ते या समस्या प्राधान्याने सोडवताना ग्रामस्थांना अपेक्षित असलेल्या विकासकामाना 100 टक्के प्राधान्य दिले जाईल. असा विश्वास निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला.
यावेळी भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, भाजप युवामोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक प्रयास भोसले, भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, चौके माजी सरपंच राजा गावडे, आनंदव्हाळ सरपंच अशोक चव्हाण, रमेश वस्त, माजी सरपंच रमेश पोमजी चव्हाण, बुथ प्रमुख भगवान विलास मांजरेकर यांसह नंदकिशोर सुरभा चव्हाण, सुरेश साळकर, महादेव चव्हाण, किशोर पाताडे, रवींद्र चव्हाण, अमित गावडे, सागर चव्हाण, बाबू मांजरेकर, चंद्रहास चव्हण, बाळू पोखरणकर, गुरु नामनाईक, महेश कोचरेकर, विनीत वस्त, बाबल पोखरणकर, प्रदीप पाटकर, पुजा पोखरणकर, भावना पोखरणकर, सुहासिनी मांजरेकर, अमिषा किडये, वैशाली मांजरेकर, भाग्यश्री मांजरेकर, दर्शना पोखरणकर, प्रशांत मेस्त्री, हेमंत मेस्त्री, प्रदीप चाव्हण, गोविंद चव्हाण, काशिनाथ चव्हाण, सुंदर मांजरेकर, शिवराम चव्हाण, प्रमोद चव्हाण, यशवंत लाड, चंद्रहास चव्हाण, बापू चव्हाण, सुभाष लाड, शिवानी चव्हाण, भावना लाड, सुनीता चव्हाण, जानव्ही चाव्हण, रिया चव्हाण, सुप्रिया चव्हाण, शुभांगी चव्हण, अशोक चव्हाण, आत्माराम चव्हाण यांसह प्रवेश अन्य प्रवेशकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत, बाबा मोंडकर यांनी विचार मांडताना राणे साहेबांसोबत असलेला हा गाव लोकसभा निवडणुकीत 80 टक्के मताधिक्य देईल असा विश्वास व्यक्त केला. गावात आमदार, खासदार तसेच याआधी सत्ता होती त्यांनी काही केले नाही. पाण्याचे स्रोत नसताना केवळ पाईपलाईन टाकण्याचे काम सूरू आहे. मात्र भाजपच्या माध्यमातून राणे साहेबांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. रस्तेही डांबरीकरण होतील असे सांगितले.
विकासाचा दृष्टिकोन ठेऊन भाजपात प्रवेश : सरपंच
सरपंच भाऊ चव्हाण म्हणाले, विकासाचा दृष्टिकोन ठेऊन आपण भाजपात प्रवेश करत आहोत. ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास हेच धोरण यापुढे राहील. राणे साहेबांना मोठे मताधिक्य गावातून देऊ. असाही विश्वास सरपंच यांनी व्यक्त केला.
कुडाळ मालवण मधून राणे साहेबांना 25 हजाराचे मताधिक्य : निलेश राणे
सर्वच ठिकाणी जनतेचा वाढता पाठिंबा पाहता राणे साहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. कुडाळ मालवण मधून राणे साहेबांना 25 हजाराचे मताधिक्य मिळेल. असा विश्वास भाजपा नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला.











