कोकणसाठी स्वतंत्र आंबा बोर्ड स्थापन करणार

केंद्रीय मंत्री अमित शाह यांची रत्नागिरीत घोषणा 

रत्नागिरी| प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कोकणला भरभरून दिले आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण, वंदे भारत ट्रेन, काजू बोर्ड स्थापना, १२१ कोटींचे फिशिंग हब यांसारखी कामे केली आहेत. तर भविष्यातही स्वतंत्र आंबा बोर्ड स्थापन करताना ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून कोकणसाठी भरीव निधी केंद्र सरकार देईल, अशी ग्वाही ना. शाह यांनी दिली. १० वर्षात काँग्रेसच्या सरकारने महाराष्ट्राला १.९९ हजार कोटी इतका निधी दिला मात्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात १० लाख ८० हजार इतका निधी दिला. तर मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून १३ हजार कोटींचे कर्ज छोट्या मोठ्या उद्योगांना विनातारण उपलब्ध करून दिले, ही आहे मोदींची गॅरंटी असे शाह यांनी नमूद केले.