गेल्यावर्षी गणेशोत्सवाची तिकिटे काढन्या साठी
कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटांतच एक हजारांपार गेली होती. त्यानंतर त्यात तिकीट आरक्षणात गैरप्रकार झाल्याची शंका प्रवाशांकडून व्यक्त केली होती. तपासअंती यात अनेक तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले होते.. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडीचे तिकिटे ४ मेपासून काढण्यास सुरुवात झाली. गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधी म्हणजे ४ सप्टेंबर रोजीचे तिकीट
काढण्यासाठी कोकणवासीयांची प्रचंड लगबग सुरू होती. त्यासाठी तिकीट केंद्रावर आदल्या रात्रीपासून रांगा लावण्यात येत आहेत. त्यानंतर ४ सप्टेंबरचे आरक्षण ७ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू झाल्यानंतर काही वेळातच गाड्या फुल्ल झाल्या
मुंबईतून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मार्गावर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ७ मे रोजीपासून सुरू झाले. ७ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून पुढील १२० दिवसांचे म्हणजे ४ सप्टेंबरपर्यंतचे तिकीट काढता येणे शक्य आहे. मात्र, सकाळी ८ वाजता तिकीट काढण्यास सुरुवात केली असता काही मिनिटांतच कोकणात जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादीची क्षमता संपली. त्यामुळे प्रत्ये रेल्वेगाडीची प्रतीक्षा यादी ‘रीग्रेट’ दाखविण्यात येत होती. कोकणकन्याची प्रतीक्षा यादी ५८० च्या पुढे गेली त्यानंतरची इतर कोकणात जाणा- एक्स्प्रेसची तिकिटे काढण्या गेल्यास ‘रीग्रेट’ दाखवले जात आहे.










