पोईप : मुंबईत निधन मालवण तालुक्यातील मसदे आवळदेवाडी येथील विवाहिता सौ. संजना संकेत सावंत वय २६ हिचे तापाच्या आजाराने उपसंजना चार चालू असताना रविवारी मुंबई येथील नायर रुग्णालयात निधन झाले.
मयत संजना हिचे पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिचे माहेर मालवण तालुक्यातील वायगणी येथे आहे. दरम्यान लग्न झाल्यावर पासून संजना हि पती समवेत ठाणे दिवा येथे वास्तव्यास होती दरम्यान १ मे रोजी तापाच्या आजारावर उपचारासाठी तिला मुंबई येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ताप कमी न होता यातच तिचे रविवारी निधन झाले. तिच्या पश्चात पति.सासू.सासरे.आई.
वडिल. भाऊ. दिर. असा परिवार आहे. मागील पाच दिवस तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. डोक्यात ताप चढून प्लेटलेटची संख्या कमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्यावर सोमवारी सकाळी मसदे आवळदेवाडी येथील स्मशान भूमित शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथील समाजिक कार्य करते सुरेश सावंत. सो. सुमित्रा सावंत. यांची ति सून होय. सौ. संजना हिचा आकस्मिक निधनाने मसदे आवळदेवाडी पंचक्रोशीतील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.











