श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मारुती मंदिर येथे २० जून साजरा होणार शिवराज्यभिषेक दिन

रत्नागिरी । प्रतिनिधी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी तर्फे तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (शिवराज शक ३५१ प्रारंभ) म्हणजेच गुरूवार दिनांक २० जून २०२४ रोजी सकाळी ७ वाजता शिवराज्यभिषेक दिन मारुती मंदिर सर्कल, रत्नागिरी येथे आयोजित केला आहे. यंदा शिवराज्याभिषेक दिनाचे ३५१ वे वर्ष आहे. या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मुर्तीची नित्यपुजा करून वेदमंत्रासह विधिवत पध्दती नुसार दुग्धाभिषेक करून हा आनंदाचा सोहळा साजरा केला जाणार आहे.

तरी रत्नागिरीतील सर्व शिवभक्तांनी तसेच शिवप्रेमी नी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी. तर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – देवेंद्र झापडेकर_7020024242 , जयदीप साळवी : 9922429577