सावंतवाडी : सावरवाड येथे सुरू असलेल्या कृषि सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या
कृषिदुतांनी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सावरवाड ते श्री विठल मंदिर अशी कृषिदिंडी आयोजित केली होती.
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा,सावरवाड येथे सरपंच मा. देवयानी पवार आणि शाळेच्या मुख्याध्यापिका मा. विभावरी सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वाजत-गाजत घोषवाक्यांचे फलक घेऊन घोषणा देत ही दिंडी सुरू झाली. यात सरपंच, शाळेचे मुख्याध्यापिका,सदस्य,कृषिदुत आणि शाळेचे विद्यार्थी सहभागी होते .श्री विठ्ठल मंदिर मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी तर्फे वृक्षारोपण करून संपन्न झाली.
कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य.योगेश पेडणेकर,कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रसाद ओगले, प्रा.गोपाळ गायकी, प्रा.महेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत अथर्व मठकर, लक्षदिप शेटकर, श्रीनिवास वाळके, ऋत्विक तेली, अनिरुद्ध.पी, अरूणदेव सी.पी. यांनी कार्यक्रम पार पाडला. तसेच दि.४/७/२०२४ रोजी मोफत नेत्र तपासणी आणि दि.५/७/२०२४ रोजी मा. ब्रिगेडीयर.सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत १रूपयात पीक विमा योजना व बॅंक लोन संदर्भात माहीती देण्यात येणार आहे.












