आजचा दिवस कसा जाईल? 6 जुलै शनिवार

आजचा दिवस कसा जाईल?
6 जुलै 2024 शनिवार

मेष रास
आज नशिबाचा विचार करत बसू नका. हातात असलेल्या रिसोर्सेसचा योग्य वापर करून घ्या. पैशाची कामे मार्गी लागतील.

वृषभ रास
आज गरम पदार्थांपासून तसेच आगीच्या साधनांपासून लांब रहा. तुमचा प्रभाव इतरांवर पडेल. आज पोटात दुखू शकते. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. योग्य वेळी डॉक्टरकडे जा.

मिथुन रास
आज तुमच्या मनाकडे लक्ष द्या. तुमच्या अंतस्फूर्तीनुसार काम केल्यास फायदा होईल. नकारात्मक विचार मनातून बाजूला करा शक्यतो कोणाचेही सिक्रेट उघड करू नका.

कर्क रास
आज कष्टाचे फळ मिळेल. मनाप्रमाणे कामे होतील. मौजमजेसाठी खर्च होतील. कपडे तसेच दागिने खरेदी करू शकता.

सिंह रास
आज पैसा गुंतवला नाही तरी चालेल पण शरीराला कामात गुंतवून ठेवा. एका जागी बसून कामे करण्याचे योग आहेत. आळशीपणा वाढू शकतो.

कन्या रास
आज पाहुणे घरी आणायची शक्यता आहे. पाहुणचार करण्यात वेळ जाईल. आनंद आणि समाधान मिळेल. इतरांची गरज नसल्यासारखे वागू नका, त्याचा तुम्हाला नंतर त्रास होईल.

तुळ रास
आज प्रेमात पडण्याचे योग आहेत. मनाप्रमाणे घटना घडतील. मानसिक आनंद मिळेल. एखादा ड्रीम प्रोजेक्ट मिळू शकतो.

वृश्चिक रास
आज तुमच्या वस्तूंची चोरी होऊ शकते त्यामुळे तशी खबरदारी घ्या. काम वेळेत पूर्ण करा, तसेच नियम आणि कायद्याचे पालन करा.

धनु रास
आज इतरांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतील. वेळ वाया घालू नका. स्पर्धेत उतरण्यासाठी चांगला काळा आहे. स्पोर्ट्स मध्ये यश मिळेल.

मकर रास
आज नवीन सुरुवात करा. रिस्क घ्या, पण धोके लक्षात घेऊन पुढे जा. मित्राची मदत मिळेल. प्रवास करताना काळजी घ्या.

कुंभ रास
आज प्रवास करण्यासाठी चांगला काळ आहे. कामाच्या जागा बदली झाल्यामुळे दुसरीकडे शिफ्ट होण्याचे योग आहेत. मनशांती मिळेल. एखाद्या प्रॉब्लेम मधून सुटका होईल.

मीन रास
आज ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यात समाधान माना. इतरांकडे मदत मागा. तुम्ही चुकीचे विचार करू शकता. हेल्थ कडे लक्ष द्या. अपघाताचे योग आहेत त्यामुळे काळजी घ्या.
@Ritikaslifetherapies
Riitu – The TAROT – ASTRO Consultant
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353+