पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीकक्षा : गटविकास अधिकारी आत्मज मोरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौघुले यांनी केले अभिनंदन
अमित खोत | मालवण : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा रेवतळे येथील विद्यार्थिनी लेईशा नारायण पराडकर हिने मालवण तालुक्यात प्रथम प्राप्त केला आहे. जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत लेईशा ने आठवा क्रमांक पटकाविला आहे.
परीक्षेसाठी तिला श्रीमती देशमुख मॅडम, गोगटे सर, कु. मनाली वेंगुर्लेकर व शिक्षक, पालकांचे मार्गदर्शन लाभले. लेईशा हिने यापूर्वी वक्तृत्व, निबंध तसेच क्रीडा स्पर्धेतही यश मिळविली आहेत. कुमारी लेईशा ही चौके मांडखोल जि. प. शाळेचे उपशिक्षक नारायण पराडकर तसेच मालवण पंचायत समिती ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक सौ. वर्षा पराडकर यांची ती कन्या आहे.
मालवणचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौघुले यांनी लेईशा हिचे अभिनंदन केले. यावेळी प्राथमिक शिक्षक बंडू राठोड तसेच पराडकर कुटुंबीय उपस्थित होते.












