पावशी येतील तुळशीदास खोबरेकर यांचे निधन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पावशी गावातील रहिवासी व मुळ कवठी, चे श्री तुळशीदास मुकुंद खोबरेकर(83) यांचे गुरूवारी ४ जुलै रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली व नातवंडे असा परिवार आहे. ते कवठी बंदरवाडा येथील जिवन साहित्य नाट्य मंडळाचे संस्थापक सदस्य होते.

 

कवठी गावात खाजगी शिक्षकी पेशा सांभाळताना तेथे वाचनालय सुरु केले. त्यानंतर तीस वर्षांपूर्वी पावशी गावी आल्यानंतर गावात प्रथम आदर्श वाचनालय व ग्रंथसंग्रहलयाची स्थापना केली. हा सर्व खटाटोप करीत असताना दैनिक रत्नागिरी टाईम्स, मधुन गजाली, मालवणी सदर सातत्याने चालविले होते. गावातील सण उत्सवाला मदत करणे गोरगरिबांना सहकार्य करणे हा त्यांचा स्वभाव होता. माहिती विभागातील नरेंद्र खोबरेकर, व ग्रामसेवक उमेश खोबरेकर यांचे ते वडील होत.