आंबा घाट Breaking : आंबा घाटात सापडले दोन अनोळखी मृतदेह

 

 

 

संगमेश्वर : 

आंबा घाटातील सड्याचा कडा स्पॉटवर दोन अनोळखी मृतदेह दिसून आले आहेत. दोन्ही पुरुषांचे मृतदेह असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हि माहिती मिळताच देवरुख व शाहूवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी घटनस्थळी पोचले आहेत. सह्याद्री चांदोली व्याघ्र प्रकल्प याठिकाणी दुचाकी आढळून आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर पोलीस खात्याकडून मृतदेह काढण्यासाठी रेसक्यु ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे