लाखोंची फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ भामट्यास २३ पर्यंत पोलीस कोठडी

खेड (प्रतिनिधी) कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवत येथील एका तरुणाची २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी येथील पोलिसांनी सुरत येथून गजाआड केलेल्या नारायणलाल जोशी या भामट्यासन्यायालयासमोर हजर केले असता त्याला २३ ऑगस्टपर्यंत पोलीस
कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याच्या शक्यतेने पो. नि. नितीन भोयर यांच्याकडून सखोल तपास सुरू असून आणखी कांही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता आहे. येथील पोलिसांनी यापूर्वी धीरज नांगरा (रा. चंढीगड) याला चंदीगड येथून अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू होता. त्यानुसार जोशी याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जोशी याने दिल्ली. बंगलोर, महाराष्ट्र येथील अनेकांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही पडताळा पोलिसांकडून सुरू आहे.