प्रिमियम सायकल शोरूम व सर्विस सेंटर : ३ री शाखा सुरु
सावंतवाडी । प्रतिनिधी : सायकल म्हटले की सावंतवाडी शहरात पहिलं नाव समोर येतं ते पेडणेकर सायकल कंपनीचं. सन १९५३ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेल्या व सावंतवाडी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ब्रँडेड सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण असलेल्या पेडणेकर सायकल कंपनीने ,ग्राहकांच्या सेवेसाठी आजपासून सावंतवाडी शहरात आपलं तिसरं दालन सुरू केलं आहे.
सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस चर्च रोडवरील भालचंद्र सदन इमारतीतील शॉप नं. ६ मध्ये आजपासून पेडणेकर सायकल कंपनीचं ‘इलेक्ट्रिक सायकल्स व प्रीमियम गिअर सायकल’ चा भव्य शोरूम सावंतवाडीकरांच्या सेवेत रुजू झाला आहे.
एकाहून एक आकर्षक अशा ब्रॅण्डेड सायकल या ठिकाणी उपलब्ध आहेत. येथे प्रीमियम गिअर सायकल केवळ १३ हजार ९९९ पासून तर इलेक्ट्रिक सायकल २४ हजार ९९९ पासून सुरु आहेत. तसेच या ठिकाणी बजाज फायनान्सतर्फे सुलभ हप्त्यांमध्ये कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
तरी या नव्या व भव्य शोरूम ला एकदा अवश्य भेट द्या व आपली आवडती सायकल घरी घेऊन जा असे आवाहन पेडणेकर सायकल कंपनीचे प्रोप्रायटर शरद चंद्रशेखर पेडणेकर यांनी केले आहे.












