सिंधू कन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टाचे महिला सक्षमिकरण अंतर्गत आदर्शवत संघटित कार्य
सिंधू कन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ; महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यक्रम
अमित खोत | मालवण : राज्यात भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत असताना जनहिताच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला भगिनी अधिक सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात या दृष्टीने सरकार विविध योजनांचे पाठबळ देत असताना
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सिंधू कन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा गेली 14 वर्षे महिला सक्षमिकरण अंतर्गत करत असलेले संघटित कार्य आदर्शवत असे आहे. मी ही एक भाऊ म्हणून सदैव आपल्या सोबत असून खा. नारायण राणे साहेब यांच्या पुढाकारातून शासनाच्या माध्यमातूनही आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. असे प्रतिपादन भाजपा नेते निलेश राणे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्पतर्गत सिंधू कन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा मालवण ची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा येथे भाजपा नेते माजी खा. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, लेखाधिकारी आशालाता जमणे, प्रकल्प सहाय्यक चंद्रकांत मापनकर, सिंधू कन्या लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा प्रीती सावंत, उपाध्यक्ष शितल कांबळे, सचिव मृणाल सावंत, कोषाध्यक्ष प्रतीक्षा परब, मेघना दळवी, कल्याणी परब, रूपा गोसावी, बबीता कदम, श्रेया जाधव, कृपा गोसावी, माधवी कदम, प्रिया परब तसेच सिंधू कन्या लोकसंदेश साधन केंद्राच्या व्यवस्थापिका गीता विनायक चौकेकर, लेखापाल तनवी तुषार सकपाळ, संयोगिनी मंगल तांबट, स्मिता लंगोटे, मयुरी मालनगर, वसुधा कदम तसेच सर्व सीआरपी व जिल्हा उद्योग केंद्राच्या योगिता जराटकर, ओबीसी महामंडळाचे प्रसाद गावडे, आरबीआयचे किरण पिंगुळकर, आरसिटीचे किशोर वडी तसेच महिला व बाल विकास अभय केंद्राचे मेगा वजराटकर, महात्मा फुले महामंडळाचे वर्षा मॅडम, संत रोहिदास महामंडळाचे रिद्धी मॅडम, महिला बालविकास समुपदेशन केंद्राचे महेंद्र जाधव ऍड. नाईक मॅडम या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुकन्या लोकसंचालित साधन केंद्राची 14 वी वार्षिक सभा संपन्न झाली.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मामा माडये, संतोष साटविलकर, आशिष हडकर यांसह अन्य भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा समन्वयक नितीन काळे, अध्यक्षा प्रीती सावंत, व्यवस्थापिका गीता चौकेकर यांनी विचार मांडताना सिंधू कन्या लोकसंचलित साधन केंद्र विविध उपक्रम व भविष्यातील दृष्टिकोन सांगितला.
यावेळी महिला भागिनींनी निलेश राणे यांना राख्या बांधत ओवाळणी केली. एक आपलूकीचे नाते यावेळी दिसून आले. एकूणच हा सर्व सोहळा आनंदाई ठरला. तुमच्या मातोश्री सौ. निलमताई राणे आमच्या कार्यक्रमाला एकदा आल्या होत्या. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला याव्यात ही आमची सर्वांची इच्छा होती. ती यावर्षी पुर्ण झाली. असे सांगत गीता चौकेकर यांनी आभार मानले. यावेळी निलेश राणे यांनी दोन लाखाची देणगी जाहीर केली.











