जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूलची कु.आस्था लोंढे द्वितीय

सावंतवाडी । प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, माध्यमिक शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कॅरम खेळात १४ वर्षाखालील मुलींच्या गटात मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थ्यांनी कु‌.आस्था अभिमन्यू लोंढे हीने द्वितीय क्रमांक पटकावला.

 

 

 

ती तालुका तालुका स्तरावर देखील द्वितीय आली होती. तिच्या या यशाबद्दल मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालधाना, पर्यवेक्षक संध्या टीचर, तसेच क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो, संपूर्ण मिलाग्रीस परिवार अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.आस्था ला मुक्ताई अकॅडेमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर हे प्रशिक्षण देत आहेत.