संजय राऊत आणि सत्यपाल मलिक या दोघांची नार्को टेस्ट करावी : आमदार नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी

सत्यपाल मलिक आणि संजय राऊत या पाकिस्तानच्या दोन एजंटांची दिल्ली येथे भेट झाली आहे. यांची भेट म्हणजे अतिरेकी कारवायांची योजना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात अतिरेकी कारवाही संदर्भात काही झाले तर त्यासाठी ही भेट कारणीभूत ठरवावी असे सांगतानाच या दोघांच्या भेटीत निश्चित काय बोलणे झाले हे समजण्यासाठी केंद्र सरकारने या दोघांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
दिल्लीत सत्यपाल मलिक आणि संजय राऊत यांचे भेट झाली. या भेटीत संजय राऊत यांनी मल्लिक यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे. या संदर्भात नितेश राणे यांना विचारले असता नितेश राणे म्हणाले की, सत्यपाल मलिक आणि संजय राऊत अशा दोघांची भेट म्हणजे पाकिस्तानचे दोन एजंट भेटणे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे पुढे काही भारत विरोधी घटना घडल्या किंवा अतिरेकी कारवाया झाल्या तर केंद्र सरकारने या भेटीला त्याचे कारणीभूत ठरवावे. मलिक, राऊत आणि पाकिस्तान यांच्या भाषा सारख्याच असतात. त्यामुळे या दोघांच्या भेटीचे उद्दिष्ट काय होते हे पाहणे आवश्यक आहे. ते कोणते षडयंत्र रचत होते का? देशाच्या विरोधात कोणत्या कारवया शिजत होत्या का ? या सर्व बाबतीमध्ये त्याच्यावर केंद्र सरकारने बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. या दोघांच्या भेटीमुळे देश विरोधी कारवाया होण्याची शक्यता वाढली आहे, त्यामुळे या दोघांचीही नार्को टेस्ट करावी अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करेन असे आमदार राणे यांनी सांगितले.
पाकिस्तान सरकारने मलिकच्या वक्तव्यानंतर भारताच्या प्रतिभे बद्दल एकंदरीत केलेली टीका आणि या दोघांचीही भेट म्हणून मी संजय राऊतला सांगेन मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ते पार्सल आणण्यापेक्षा मलिक सकट राउत याने पाकिस्तानात निघून जाव आणि तिथे बसून शीरखुर्मा, बिर्याणी खावी. अशा देशद्रोही लोकांची आमच्या भारताला काही गरज नाही. असे सांगतानाच आमच्या मुंबई, महाराष्ट्र मध्ये मलिक सारख्या देशद्रोह्याला आम्ही पाऊल ठेवू देणार नाही असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला. तर कोषारी यांनी भारत किंवा महाराष्ट्र याबद्दल कोणतेही वाईट वक्तव्य केलेले नाही. तसेच भारताची सुरक्षा धोक्यात येईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही, पंत प्रधान यांच्या बांत चुकीचे वक्तव्य केलेलं नाही.त्यामुळे कोणाची बरोबरी कोणाबरोबर करतोय याचा विचार राऊत याने करावा असा इशाराही आमदार आणि यांनी दिला.

ते मुळापासून उपटलेत
मुळावर येणारे प्रकल्प अढविले यापुढेही अडविणार असे सांगत हा उर्शी प्रकल्पही होऊ देणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनाच मुळापासून उपटून टाकले आहे. मूळ आणि उद्धव ठाकरे यांचा काही संबंध राहिलेला नाही. पहिले स्वतःच मूळ कुठे राहिले ते शोधा आणि नंतर दुसऱ्याच्या मुळापर्यंत पोहोचा असा सल्ला नितेश राणे यांनी देताना ही रीफायानारी व्हावी असे पत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्राला दिले आहे. त्यामुळे तेव्हाकचे उद्धव ठाकरे आणि आत्ताचे उद्धव ठाकरे यात काय फरक तर तो केवळ चेकच्या आकड्यांचा फरक आहे.चेकचा आकडा वाढविला जावा यासाठी ते बोलत आहेत. उद्धव ठाकरे यांचे राजकारण म्हणजे त्यांचं घर चालविण्याच साधन आहे. दोन्ही मुलांची लग्न करायचीत, मुंबई महानगरपालिका हातातून गेलिय, सरकार मध्ये स्थान नाही अशी त्यांची स्थिती झाली आहे. ते स्वतःचा खर्च करत नाहीत. जेवणाचा, बाहेर फिरण्याचा खर्च स्वतः करत नाहीत.आता हा खर्च कसा करावा म्हणून ही त्यांची धडपड आहे. यापूर्वी त्यांनी सी वार्ड,विमानतळ प्रकल्प,जैतापूर याला असाच विरोध केला होता. मात्र मिठाई पोहोचल्यावर ते विमानतळाच्या उद्घाटनासाठी आले होते. अशी टीका करताना विनायक राऊत आणि वैभव नाईक यांच्यावरील निशाणा साधला.

खंजिर खूपसण्यात उद्धव ठाकरे यांची पीएचडी
पाठीत खंजीर खुपसणाऱ्यास आपण कधीच माफ करणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, नितेश राणे म्हणाले की ते आरशात बघून भाषण करत असतील. कारण त्यांनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली. सर्वात मोठा गद्दार कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सख्ख्या भावाप्रमाणे पाच वर्ष उद्धव ठाकरे यांना वागवलं मात्र त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्य मंत्री झाले अशी खिल्ली यावेळी त्यांनी उडविली.