माळगाव शाळेमध्ये ‘उडाण’ व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

 

 

ह्युमन राईटस असोसिऐशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा आणि लाईफ सजेशन ऑर्गनायझेशन ठाणे संस्थेच्या वतीने आयोजन

मालवण | प्रतिनिधी : मालवण बागायत येथील अँड. गुरूनाथ कुलकर्णी इंग्लिश शाळेमध्ये ‘उडाण’ व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा लाईफ सजेशन ऑर्गनायझेशन ठाणे या संस्थेच्या वतीने घेण्यासाठी हुमन राईटस असोसिऐशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले.

 

संस्था जिल्हा संघटक अर्जुन परब, तालुका संघटक राजेश कुमार लब्दे, जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर यांचे सहकार्य लाभले.

 

विद्यार्थांना पुढील धेर्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल घडवून यशस्वी कसे घडवावे या बद्दल मार्गदर्शन केले गेले. लाईफ सजेशन आँरगनायजेशनचे अध्यक्ष नामदेव तळवडकर यांनी मार्गदर्शन केले, त्यांच्या तर्फे गावातील अनेक शाळेमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले जाते.

 

या कार्यक्रमाचे व्यवस्थापन पत्रकार गोपाळ धुरी आणि ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण यांच्यावतीने करण्यात आले होते.आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक जोशी सर यांनी केले.