माखजन,करजुवे परिसरात सवाद्य बाप्पाला निरोप

 

माखजन |वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील माखजन,करजुवे आरवली परिसरात बाप्पा सवाद्य निरोप देण्यात आला.

गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषात परिसर दुमदुमून गेला.ताशे,सनई,झान्ज,आदींच्या वादनात तर फटाक्यांच्या धामधुमीत विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या.मुंबई,पुण्याहून आलेल्या चाकरमान्यानी पावसाने उघडीप दिल्याने मिरवणुकीत मनमुराद आनंद लुटला. गुलालाची उधळण असल्याने मिरवणुकात अजूनच रंगत आलेली पाहायला मिळाली.पारंपरिक ठरल्या ठिकाणी बाप्पा चे विसर्जन करण्यात आले.विसर्जनापूर्वी सामूहिक आरती व त्यानंतर प्रसाद वाटपाचे कार्यक्रम झाले.सर्वत्र गणेशोत्सव शांततेत,व मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.