देवगड
बाजारात जातो असे सांगून सकाळी निघून गेलेला मच्छिमार खलाशी सायंकाळी ५.३० च्या सुमारास देवगड किल्ला मारुती मंदिर खाडीपात्रात मयत स्थितीत आढळून आला.या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची घटना २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० चे सुमारास घडली.या घटने संदर्भात फिर्यादी गणेश जत्ती हल्लेर वय ३२ राहणार हेगिरी तोनावर कारवा उत्तर कानडा कर्नाटक यांनी दिली आहे .
यातील मयत मंजुनाथ जत्ती हल्लेर वय ३६ याला फिट येण्याचा आजार होता व त्याच्यावर औषध उपचार सुरू होते. २५ सप्टेंबर रोजी सकाळी बाजारात जातो असे सांगून गेले सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत न आल्याने त्यांच्या शोध घेण्यात आला .त्यावेळी किल्ला आनंदवाडी खाडीपात्रात मयत स्थितीत आढळून आले. अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.










