मालवण बाजारपेठ येथील श्री. हनुमान मंदिर सार्वजनिक गणेश उत्सव 2024 चित्रकला स्पर्धा
अमित खोत | मालवण : मालवण बाजारपेठ येथील श्री. हनुमान मंदिर सार्वजनिक गणेश उत्सव 2024 निमित्ताने मंडळाच्या वतीने आयोजित ‘गणेशचित्र’ या चित्रकला स्पर्धेला रेकॉर्डब्रेक स्वरूपात उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
स्पर्धेसाठी आलेल्या मुलांना मंदिरातील बैठक व्यवस्था फुल्ल झाली. दोन गटात ही स्पर्धा संपन्न झाली. मोठा गट चौथी ते सातवी व लहान गट बालवाडी ते तिसरी अश्या स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भटजी नारायण चिंचळकर, बलवंत चिंचळकर यांच्या पाठोपाठ मुलांनी मारुती स्तोत्र म्हणून स्पर्धेला सुरवात केली.
अध्यक्ष नाना पारकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, परशुराम पाटकर, हर्षल बांदेकर, कुलराज बांदेकर, संभव कुडाळकर, मयु पारकर, राजेश पारकर, कुशल अंधारी, साईश बांदेकर, लौकिक अंधारी, मंदार अंधारी, प्रतीक अंधारी, स्वप्नील अंधारी, सरदार ताजर, वैभव मालंडकर, सुमेध जामसंडेकर, निहार सापळे, नरिज सापळे, वरद सापळे, चिन्मय केळुसकर, कुणाल मालवणकर आणि व्यपारी बांधव तसेच पालक बहूसंख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती स्पर्धा प्रमुख विजय केनवडेकर यांनी दिली.









