खेडमध्ये १३ रोजी केशवराव भोसलेंची शोकसभा

खेड (प्रतिनिधी) तालुका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष केशवराव जगतराव • भोसले यांचे २३ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. मराठा भवन केशवराव भोसले सभागृहात शोकसभेचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, अॅड. आनंद भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख
शशिकांत चव्हाण, शरद शिर्के, संतोष उतेकर, विश्वास
शिंदे, विजय कदम, चंद्रकांत चाळके, श्याम मोरे, देवेंद्र मोरे, विश्वास दळवी, संजय आंब्रे, नारायण भोसले यांच्यासह समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.