भाजपच्या (BJP’s) पहिल्या यादीत नितेश राणे यांना उमेदवारी; कार्यकर्त्यांकडून जल्लोष
कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना भारतीय जनता पार्टीने (BJP) जाहीर केलेल्या पहिल्या यादीत उमेदवारी दिली आहे. 99 उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पार्टीच्या (BJP’s) केंद्रीय कार्यालयाने जाहीर केली. यात आमदार नितेश राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे.
पहिल्या यादीत ही उमेदवारी जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या (BJP) कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा केला जात आहे.












