कुडाळ-मालवण आदर्श मतदारसंघ घडवण्याचा प्रयत्न : निलेश राणे

शिवसेना पक्षाच्या वतीने निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर ; उद्या उमेदवारी अर्ज करणार दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कुडाळ मालवण मतदार संघातून निलेश राणे यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला 269 कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून उमेदवारी दिल्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्वीपेक्षा अजून जोमाने काम करून हा एक आदर्श मतदारसंघ घडवण्याचा प्रयत्न करेन असा आपणास शब्द देतो. अश्या भावना निलेश नारायणराव राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.