आ. नितेश राणे यांची अभाविपच्या सावंतवाडी कार्यालयाला भेट

 

अभाविपच्या कोंकण प्रांत अधिवेशनासंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सावंतवाडी । प्रतिनिधी : भाजपा आमदार नितेश राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशन कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. २७,२८ व २९ डिसेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोंकण प्रांत अधिवेशन सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी कार्यालयाला भेट देत
अभाविपच्या तसेच कार्यक्रम आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत अधिवेशनाची माहिती घेऊन पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारत मातेची प्रतीमा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, अधिवेशन स्वागतसमिती सचिव अतुल काळसेकर, व्यवस्था सहप्रमुख डॉ. राजशेखर कार्लेकर, शहरमंत्री स्नेहा धोटे, व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर, अवधूत देवधर, तुषार पाबळे, विनीत परब, सौरभ दांडगे, सिद्धेश म्हापसेकर,दिग्विजय पाटील, जयवंत पवार, गौरी वारंग आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ही आमदार नितेश राणे यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर,माजी नगरसेवक गुरू मठकर, महिला अध्यक्षा मोहीनी मडगावकर, माजी जि.प. सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर,खरेदी विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे, ज्ञानेश्वर सावंत, मधु देसाई, प्रविण देसाई, हनुमंत पेडणेकर, दिलीप भालेकर, संतोष गांवस, उमेश पेडणेकर, ओंकार सावंत, संजय नाईक, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.