मालवण बांगीवाडा येथे घडली दुर्घटना
मालवण | प्रतिनिधी : मालवण बांगीवाडा येथे इमारतीवर सेंट्रिंगचे काम करत असताना सेफ्टी बेल्ट निसटल्याने आठव्या मजल्यावरून पडून रोहित कुमार चौधरी वय 28 रा. मध्यप्रदेश यां कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बांगीवाडा येथील लीलाधर सारंग यांच्या इमारत ठिकाणी सकाळी सेंटरिंगचे काम सुरु होते. यावेळी रोहित चौधरी याच्या समवेत अन्य कामगार काम करत होते. मात्र रोहित कुमार चौधरी याने बांधलेला सेफ्टी बेल्ट काम करत असताना सुटला आणि तो आठव्या मजल्यावरुन खाली कोसळला. त्याला त्याच्या अन्य कामगारांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.











