शिरगाव (प्रतिनिधी) –महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव जिल्हा परिषद गटामार्फत स्लो सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा दोन गटांत घेण्यात येणार आहे प्रथम गट: (इयत्ता पहिली ते पाचवी)
द्वितीय गट ( इयत्ता सहावी ते खुला गट) प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजन रविवार, दिनांक २२ जून रोजी सायंकाळी ४ वाजता शिरगाव हायस्कूलच्या पटांगणावर करण्यात आले आहे.












