गावखडी / वार्ताहर
ढोल ताशांच्या गजरात, “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ “असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थांचा आज पालखीत विराजमान होऊन पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग श्री विठ्ठल मंदिर शेजारी सुतारवाडी कणकवली येथून हि पालखी आणण्यात आली .श्री गुरूदास गंगाराम मेस्त्री अध्यक्ष श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे यांना स्वामी स्वामी समर्थांचा आदेश झाल्यानंतर पालखी भेट देण्याचे ठरले .गुरुदास गंगाराम मेस्त्री, मदन बाळकृष्ण पांचाळ ,गुरुदास लवू पांचाळ, यांच्या हस्त कौशल्यातूनआणि श्री स्वामी भक्त परिवार यांच्या सहकार्यातून श्री स्वामी समर्थ मठ मेर्वी रत्नागिरी या मठात देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या प्रारंभीस श्री स्वामी समर्थ परिवार राठीवडे यांच्या तर्फे पुरोहित प्रकाश फडके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ मूर्ती व पादुकांवर अभिषेक अभिषेक, पूजा ,मंत्रपुष्पांजली करण्यात आली. मुसळधार पडणारा पाऊस, सोसाट्याचा वाहणारा वारा श्री स्वामी समर्थ पालखीत विराजमान होते समयी श्री स्वामी समर्थ कृपेने थांबला.त्यामुळेच जमलेले असंख्य श्री स्वामी समर्थ भक्तगणांना आनंदाची पर्वणीच लाभली आहे.”अशक्य हि शक्य करतील श्री स्वामी समर्थ ” याची प्रचिती श्री स्वामी समर्थ भक्तगणांना पालखी सोहळ्यात आली.
या कार्यक्रमाला पुजारी सहदेव पावसकर, शामसुंदर कृष्णा मेस्त्री, महेश सखाराम वायंगणकर, पार्थ सुधीर मापारी, बाबाजी रामचंद्र सावंत, अनिल अमृत कुर्ले, विद्याधर दशरथ पाटकर, महेश राजाराम गुराम, महेश काशीनाथ माळकर, अद्वैत मिरजकर ,नम्रता गुरुदास मेस्त्री, सुहासिनी शामसुंदर मेस्त्री, शैलेश शंकर माळकर, प्रसाद मिरजकर, प्रिया मिरजकर, सदानंद परुळेकर, प्रसाद आठले, कोमल आठले , कविता पवार , श्रद्धा वाडीये, आबा ठाकूर, दिलीप मेस्त्री आणि श्री स्वामी समर्थांचे बहुसंख्य भक्तगण आदिंची उपस्थिती लाभली होती.
फोटो = श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे तालुका मालवण यांच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठ मेर्वी ला पालखी देताना अध्यक्ष श्री.गुरुदास गंगाराम मेस्त्री, सहदेव पावसकर आणि श्री स्वामी समर्थ भक्तगण











