कणकवली : कणकवली वागदे नजिक असलेल्या आर्यादुर्गा मंदिर मध्ये सोमवारी रात्री पावणे बारा – बारा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. दरम्यान अद्याप येथे झालेल्या चोरीत आणखी काय चोरीस गेले याचा तपास सुरू असून कणकवली पोलीस पथकासह श्वान पथक सिंधुदुर्ग आर्यादुर्ग मंदिर येथे दाखल झाले आहे. तसेच श्वान पथकाच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे. यावेळी घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, हवालदार मनोज गुरव, श्वान पथक सिंधुदुर्ग उपनिरीक्षक शरद देठे, वागदे पोलीस पाटील सुनील कदम घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो मंदिरात प्रवेश करतेवेळी त्याच्या हातात कोणत्याही प्रकारची पिशवी नव्हती. मात्र तो मंदिरातून बाहेर जातेवेळी त्याच्या हातात निळ्या रंगाची पिशवी दिसून आली. त्याच पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस तसेच श्वान पथक तपास करत असून लवकरच चोरटा समजेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.












